औषध खरेदी बंद निर्णयाचा रुग्णांना अडीच लाखांचा फटका   

पुणे : महानगरपालिकेची औषध खरेदी बंद असल्यामुळे अडीच लाख रुग्णांना याचा फटका बसत आहे. गेल्या महिनाभरापासून रुग्णांना औषधे मिळत नाही. केवळ गंभीर आजारावरच औषधे दिली जात, असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.महानगरपालिकेची शहरी गरीब योजना आणि अंशदायी आरोग्य योजनेचे कार्ड असणार्‍या रुग्णांना महानगरपालिकेकडून औषधे देण्यात येतात. मागील वर्षीची निविदा संपल्यामुळे आता औषध खरेदी बंद आहे. त्यामुळे नागरिकांना रुग्णालयात चकरा माराव्या लागत आहेत. 
 
महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचे एकूण एक लाख सभासद आहेत. या रुग्णांना आवश्यक्तेनुसार डॉक्टरच्या चिट्टी वरुन औषधे देण्यात येतात. काही रुग्णांना वर्षभर औषधांची गरज असते. महानगरपालिका सेवेत असणारे कर्मचारी आणि अधिकारी यांना सुध्दा या योजनेतून औषधे देण्यात येतात. ही औषध खरेदी सुध्दा सध्या बंद आहे.
 
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षीच्या औषध खरेदीसाठी १८ कोटींची तरतूद करण्यात आली होती. यावर्षी सुध्दा भरीव तरतुद करण्यात आली आहे. मात्र सध्या औषध खरेदीची निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना औषध उपलब्ध होत नाही. येत्या पंधरा दिवसामध्ये औषध खरेदीची प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल. यानंतर औषधे उपलब्ध होणार आहेत. गंभर आजार असणार्‍या रुग्णांना महापालिका औषधे देत आहे.
 

Related Articles